रजनीकांत ह्यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर येथे एका महाराष्ट्रीयन मराठा हेन्द्रे पाटील (मराठी भाषक) कुटूंबात झाला.त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड
असून वडिलांचे रामोजीराव आणि आईचे जीजाबाई गायकवाड असे आहे.गायकवाड
कुंटुंबीयांच्या चार अपत्यांपैकी सर्वात लहान रजनीकांत आहेत.त्यांचे मुळ
गाव पुणे
जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आहे असे सांगीतले जाते.तसेच जेजूरीचा
खंडेराय त्यांचे कुलदैवत असल्याचे मध्यंतरी रजनीकांत ह्यांनी सकाळ ह्या
वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.रजनीकांत ह्यांना दोन मोठे भाऊ
आणि एक बहिण देखील आहे.शाळेत असतांना गरिबीमुळे त्यांना खूप कठिण
परिस्थितीत दिवस काढावे लागले.बंगळूर येथील आचार्य पाठशाळा ह्या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले व रामकृष्ण मिशनच्या बंगळूरमधील महाविद्यालयात त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण झाले.१९६८-१९७३ दरम्यान रजनीकांत मद्रास आणि बंगळूर मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळी कामं केली.त्यानंतर ते बंगळूर बस ट्रांस्पोर्ट सर्व्हिस मध्ये कंडक्टर (वाहक)
म्हणून दाखल झाले.चित्रपट काम करण्याच्या जिद्दी मुळे आणि एका मित्राच्या
मदतीने ते त्यानंतर चेन्नैला चित्रपटातील अभिनय शिकण्यासाठी गेले.मद्रास
फिल्म इंस्टीट्यूट मध्ये अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी आपल्या
अभिनयाची कारकिर्द १९७४-७५मध्ये सुरू केली.
No comments:
Post a Comment